
आर्थिक वादातून चिखलीत तरुणावर गोळीबार
बातमी थोडक्यात
जुन्या आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादानंतर चिखलीत एका तरुणावर गोळीबार करण्यात आला. चिखलीतील जाधववाडीत पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. यात जखमी झालेल्या रवी धनाजी घोगरे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वप्नील कांताराम जाधव आणि रोशन पिंगळे या दोघांना गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.