
आष्टी पोलीस ठाण्यातील निरीक्षक नियंत्रण कक्षाकडे; तीन महिन्यांसाठी पांढरे यांची नियुक्ती
बातमी थोडक्यात
आष्टी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद भुतेकर यांची नियंत्रण कक्षाकडे बदली करण्यात आली असून, तीन महिन्यांसाठी प्रोबेशनरी उपअधीक्षक भरत पांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या काळात तालुक्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने ही बदली करण्यात आली आहे. या भागात होणाऱ्या बेकायदेशीर कारवाया, चोरी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पांढरे यांच्यासमोर आहे.