
पुण्यात नवले पुलाजवळ अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यावर हल्ला
बातमी थोडक्यात
पुण्यात नवले पुलाजवळ 'लागीर झाला जी' या मालिकेतील अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यावर चार अज्ञात गुंडांनी हल्ला केला. या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कल्याणी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांनी नारहे पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली आहे.