
वर्धा जिल्ह्यात पावसाची जोरदार नोंद, दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी
बातमी थोडक्यात
वर्धा जिल्ह्यात शनिवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. नंदोरी मंडळात 148 तर पोहना मंडळात 71.3 मिमी पाऊस झाला. त्यामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मात्र जिल्ह्याची सरासरी 25.6 मिमी झाली. ऑगस्टच्या सरासरीपेक्षा ही सरासरी थोडी कमी आहे. जोरदार पाऊस न झाल्याने विहिरी, नद्या, नाल्यांमध्ये पाण्याची पातळी जैसे थे आहे. पावसाच्या कमतरतेमुळे पिकांवर ताण येण्याचे चित्र दिसत आहे. पुन्हा पाऊस थांबल्याने वातावरण चिंताजनक झाले आहे.