
मोरगावला उत्साहात सुरू झाली भाद्रपद यात्रा
बातमी थोडक्यात
मोरगाव येथील श्री मयुरेश्वराची भाद्रपद यात्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे. यात्रेसाठी राज्यातील हजारो गणेशभक्त मोरगाव येथे दाखल झाले असून, दर्शन व जलाभिषेकासाठी सकाळपासून मंदिर परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अष्टविनायकाच्या यात्रेत मोरगाव हे पहिले स्थान असून, वर्षभर भाविक यात्रेला येत असतात.