
मुंबई बंगळूरु महामार्गावर ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू
बातमी थोडक्यात
साताऱ्याहून मुंबईकडे वेगाने निघालेल्या ट्रकने मागून टेम्पोला धडक दिली. यामुळे चार गाड्या एकमेकांवर आदळून उलट्या लेनमध्ये गेल्या. यात दोन जणांचा मृत्यू झाला, बारा जण जखमी झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली. ट्रक चालक आणि मालक पोलिसांच्या ताब्यात आहेत.