
वायसीएमओयू बीकॉम एमसीए आता पूर्णपणे ऑनलाइन
बातमी थोडक्यात
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला बी.कॉम आणि एमसीएचे अभ्यासक्रम पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यास यूजीसीची मंजुरी मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला घरबसल्या अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.