
भीमा दुला शिरोडकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
ग्रामपंचायतीला सादर केलेल्या बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केल्याप्रकरणी भीमा दुला शिरोडकर यांच्या विरोधात आगशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बनावट कागदपत्रांचा वापर करून डायव्हर्जन सर्टिफिकेट आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवून ग्रामपंचायत आणि तक्रारदार महिलेची फसवणूक करण्यात आली. पोलीस पुढील तपास करत आहेत.