
देहूगाव पाणी संकट : गणेशोत्सवात तीन दिवस पाणीपुरवठा खंडित
बातमी थोडक्यात
देहूगावमध्ये गणेशोत्सवात तीन दिवस पाणीपुरवठा खंडित झाला. विठ्ठलवाडी, गाथा मंदिर आदी भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करून टँकरचा आधार घ्यावा लागला. नगरपंचायतीवर नागरिकांचा रोष वाढला. वीजपुरवठा खंडित झाल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक, भाविक त्रस्त झाले. पाणीपुरवठा पूर्ववत न झाल्यास नगरसेवकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.