पुणे पोलिसांकडून गणेश उत्सवासाठी ७ हजार ५०० जणांची तैनाती
बातमी थोडक्यात
आजपासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ७ हजार ५०० जणांची तैनाती करण्यात आली आहे. प्रमुख मंडप, गर्दीची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे पथक चोरीवर लक्ष ठेवणार आहे, तर महिला सुरक्षा पथक महिलांच्या सुरक्षेची दक्षता घेणार आहे. शांततापूर्ण उत्सवासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.