
करमाड, पाचोड, सोयगाव येथे पाऊस, खरीप पिकाला लाभ
बातमी थोडक्यात
पैठण, फुलंब्री, सोयगाव येथे पावसाच्या सरी, खरीप पिकाला दिलासा. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. पाचोड येथे रविवारी सकाळी तर करमाड येथे सायंकाळी पाच वाजता पाऊस दाखल झाला. सोयगाव तालुक्यात ३१ दिवसांच्या दुष्काळानंतर पाऊस झाला.