
जालना : मिरचीच्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
बातमी थोडक्यात
भरधाव वेगाने येणाऱ्या मिरचीच्या ट्रकने मागून धडक दिल्याने आयटीआय कॉलेज जवळ भोकरदन रोडवर दुचाकीस्वाराचा यशवंत पेंढारकर यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री ७ च्या सुमारास ही घटना घडली. जखमींना स्थानिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.