
कोकणात गणपतीच्या गाड्याचा अपघात, वाहनाचे नुकसान, ८-१० जखमी
बातमी थोडक्यात
मुंबईहून कोकणात गावी जाणाऱ्या गणपतीच्या गाड्याचा हातीवळेजवळ भीषण अपघात झाला. स्थानिकांनी धाव घेऊन मदत केली. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झालेल्या अपघाताचा तपास राजापूर पोलिसांनी सुरू केला.