
कराड जवळ २० फुटांच्या खड्ड्यात तीन वेळा पलटी झाले स्विफ्ट कारची
बातमी थोडक्यात
अंधारात एस आकाराच्या वळणावर स्विफ्ट कारचा ताबा सुटल्याने २० फुटांच्या खड्ड्यात पडून तीन वेळा पलटी झाली. गाडीतील पाचही प्रवासी सुखरूप सुटले. या सर्वांना एअर बॅगचे संरक्षण लाभले. अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रेल्वे गेट क्रमांक ९६ जवळच्या धोकादायक वळणावर सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.