
ढालगावच्या किराणा दुकानाला आगीचा तडाखा
बातमी थोडक्यात
ढालगाव येथील प्रशांत शिवरुद्र शेटे यांच्या किराणा दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामुळे दुकानातील सर्व माल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांच्या नजरेस धूर व आग लागल्याचे दिसले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले. 'प्रार्थना ट्रेडर्स' नावाचे हे दुकान ढालगाव-धालेवाडी रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेजवळ आहे.