
पुणे एफडीए कडून ४३ लाख रुपयांचे भेसळयुक्त पनीर व खवा जप्त
बातमी थोडक्यात
सातारा व सांगली येथील अधिकाऱ्यांच्या संयुक्त कारवाईत पुणे एफडीए कडून ४३ लाख रुपयांचे भेसळयुक्त पनीर व खवा जप्त करण्यात आले. एफडीएच्या कारवाईमुळे पुणे मार्केटमध्ये पनीरचा आवक निम्म्यावर आला आहे. जप्त केलेल्या नमुन्यांचा अहवाल १४ दिवसात उपलब्ध होईल.