कारगणीत पाणी वाल्व बंद करण्यावरून दोन कुटुंबांमध्ये बाचाबाची
बातमी थोडक्यात
कारगणी (ता. आटपाडी) येथील ग्रामपंचायतीचा पाणी वाल्व बंद करण्यावरून दोन कुटुंबांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेमुळे समाजात तणाव निर्माण झाला असून आटपाडी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.