
सोलापूर तालुक्यांवर दुष्काळ निकष
बातमी थोडक्यात
सोलापुरातील माळशिरस, सांगोला, मोहोळ, बार्शी या तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने एक आणि दोन दुष्काळ निकष पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन या भागातील परिस्थितीचा आढावा घेत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. दोन दिवसात अधिकारी या भागातील आकडेवारी गोळा करून सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल देणार आहेत.