
प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, यासाठी शिक्षकांचे नाशिकमध्ये मोर्चा
बातमी थोडक्यात
प्रा. सोपान खंडेराव बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, यासाठी नाशिकमधील शिक्षक संघटनांनी मोर्चा काढला. गोल्फ क्लबच्या मैदानातून सुरू झालेल्या या मोर्चाला हजारहून अधिक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. कार्यालयात निवेदन देऊन न्याय मिळावा, तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.