
दुष्काळ जाहीर करा, उडगीर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रस्ता रोको
बातमी थोडक्यात
उडगीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करत शनिवारी रस्ता रोको आंदोलन केले. स्थानिक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. अपुऱ्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान निदर्शनास आणून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागणी निवेदन देण्यात आले. प्रधानमंत्री फसल विमा योजनेतील तीन ट्रिगर पुन्हा लागू करणे, तसेच आगाऊ पीक विमा नुकसान भरपाई देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.