
माढेली-दिदोरा रस्त्यावर केबल चोरी
बातमी थोडक्यात
माढेली-दिदोरा रस्त्यावरच्या ११ खांबातून चोरट्यांनी ३३ केव्हीचा ॲल्युमिनियमचा वायर चोरून नेला. त्यामुळे दिदोरा बॅरेज पंप हाऊसचे विद्युत काम विस्कळीत झाले. ६ सप्टेंबर रोजी चोरी उघडकीस आल्याने पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्यात आला. चोरीला गेलेल्या वायर आणि संशयितांचा तपास वरोरा पोलीस करत आहेत.