
शिवसेना उप जिल्हाध्यक्षांच्या घरी गांजा आणि कोकेन
बातमी थोडक्यात
शिरोडा येथील शिवसेना उप जिल्हाप्रमुख सिद्धेश परब यांच्या घरावर अमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा, गांजा आणि कोकेन जप्त. परब यांना वेंगुर्ले पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमली पदार्थांचा स्रोत शोधून या प्रकरणातील अन्य संबंधितांची ओळख पटविण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत.