
कर्जमाफी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1 हजार 374 कर्जमुक्त शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर
बातमी थोडक्यात
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला कर्जमाफी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1 हजार 374 पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी महाराष्ट्र शासनाने जाहीर केली असून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांनी आपले थकित कर्ज तपासून सेवा केंद्रावर आधार पडताळणी पूर्ण करावी. या योजनेअंतर्गत दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे.