
पिंपरी : बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
बातमी थोडक्यात
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांवरील आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागरिकांचे आर्थिक शोषण केल्यामुळे कार्यकारी अभियंता विजय सोनवणे आणि उपअभियंता अशोक मोरे यांना निलंबित करण्यात आले. १५ दिवसांत खातेनिहाय चौकशी करून आरोपपत्र दाखल करावे.