
नाशिकला मातृवंदना योजनेच्या यशाबद्दल सन्मानित
बातमी थोडक्यात
नाशिक जिल्ह्यात मातृवंदना योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्ह्याला राज्य पातळीवर सन्मानित करण्यात आले. नाशिकमधील ५ हजार ७०५ अंगणवाड्यांच्या मदतीने पात्र महिलांना या योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.