
छत्रपती संभाजीनगरमध्ये एम.पी.एस.सी पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन
बातमी थोडक्यात
एमपीएससी पेपरफुटीचा आरोप करत छत्रपती संभाजीनगरमधील विद्यार्थ्यांनी पारदर्शकतेची मागणी करत मोर्चा काढला. विद्यार्थी कृती समितीने आयोजित केलेल्या या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा दर्शविला. अध्यक्षांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून एमपीएससीकडून ८ दिवसांत अधिकृत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली.