
राष्ट्रीय उच्च उत्पादन श्रेणीत शाहू साखर कारखाना सर्वोत्तम घोषित
बातमी थोडक्यात
शाहू साखर कारखाना राष्ट्रीय पातळीवर 2024-25 या हंगामासाठी उच्च साखर उत्पादन श्रेणीत सर्वोत्तम सहकारी साखर कारखाना म्हणून घोषित झाला. कारखान्याने सर्व स्तरांवर नियोजित पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे हा पुरस्कार मिळाला. 22 तारखेला नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.