
भारताचा परकीय चलनसाठा ७८५.७ अब्ज डॉलरवर
बातमी थोडक्यात
एका आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात ४४.९ अब्ज डॉलरची वाढ झाली असून तो ७८५.७ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपया स्थिर झाला. वाढीनंतरही रुपयावर आर्थिक आव्हानांचा दबाव कायम आहे.