
सातारा जिल्हा बँकेचे मतदान ऑक्टोबरला निश्चित
बातमी थोडक्यात
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला राजकीय रंग चढला असून निवडणूक तोंडावर आली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीत २ हजार १९० पात्र मतदार असून मागील निवडणुकीपेक्षा २२१ मतदार कमी आहेत. सोसायटी मतदारसंघ ९६३ मतदार असल्याने या निवडणुकीवर त्याचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे वेळापत्रक ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात जाहीर होईल.