
गोकुळात शेख व राठोड यांची निवडणूक अधिकारीपदी नियुक्ती
बातमी थोडक्यात
गोकुळच्या पाच वर्षांच्या निवडणुकीसाठी युसूफ शेख व प्रेमचंद राठोड यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोकराव गाडे यांनी ही नियुक्ती केली आहे. शेख सध्या जिल्हा सहकारी निबंधक कार्यालयात सहाय्यक निबंधक (प्रशासन) आहेत, तर राठोड हे सहाय्यक निबंधक, करवीर आहेत. करवीरच्या निवडणूक निर्णय अधिकारी व गोकुळच्या निवडणूक अधिकारीपदी श्रीमती मोसमी चौगुले कायम आहेत.