
ट्रकच्या धडकेत गोंदिया-बालाघाट रस्त्यावर ८ मजुरांचा बळी
बातमी थोडक्यात
भाऊ ढाब्याजवळ भरधाव ट्रकने पिकअपला धडक दिल्याने छत्तीसगडचे ८ मजूर ठार झाले असून ७ जखमी झाले आहेत. पिकअपचे मोठे नुकसान झाले असून जखमींवर भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.