
मराठा आंदोलकांचा मुंबई मोर्चा अनिश्चित, उपोषण सुरूच
बातमी थोडक्यात
मागण्या मान्य न झाल्यास मुंबई मोर्चाची ताकीद देत अंतरवाली येथील मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच आहे. शनिवारी दुपारी आंदोलनाच्या तारखेबाबत निर्णय अपेक्षित आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठे आंदोलन होऊ नये म्हणून १२ तारखेपूर्वी तोडगा निघेल, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.