
भलवानी कुटुंबातील चौघांचा भीषण अपघातात बळी
बातमी थोडक्यात
भलवानीतील हॉटेल संदीप जवळ आयशर टेम्पो आणि वॅगनआर कारची समोरासमोर धडक होऊन भलवानीतील एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. शकील मोहम्मद शेख व त्याची पत्नी व मुलांचा मृत्यू झाला. सकाळी १०.५६ वाजेपर्यंत डॉक्टरांनी चौघांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.