
महाराष्ट्राने छत्रपती संभाजीनगर येथील ह्योसंग इंडियाला १२,१२४. ८४ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले.
बातमी थोडक्यात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील औरिक सिटीतील ह्योसंग इंडिया प्रा. लि. या कंपनीला भांडवल अनुदान मंजूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पात पाच वर्षांत १२७३. ३३ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या प्रकल्पामुळे जिल्हा तांत्रिक वस्त्रोद्योगाचे मोठे केंद्र बनणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे.