
मुंगशी भागात कोल्ह्याचा हल्ला
बातमी थोडक्यात
बुधवारच्या संध्याकाळी बार्शी तालुक्यातील मुंगशी भागात एका कोल्ह्याने हल्ला करून दोन जणांना गंभीर जखमी केले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व नंतर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. कोल्ह्याला आटोक्यात आणण्यासाठी कारवाई करून परिसराचे सर्वेक्षण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.