
दापोली अणुऊर्जा प्रकल्प प्रस्ताव
बातमी थोडक्यात
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे २८०० मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असून, राज्य सरकारने टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून, प्रत्येकी १४०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प असेल. जेएसडब्ल्यू एनर्जी या कंपनीकडून ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. यापूर्वी केंद्र सरकार आणि खाजगी कंपन्यांसोबत अणुऊर्जा क्षेत्रातील तीन करार राज्याने केले आहेत.