
पावसाच्या अभावी अक्कलकोट तालुक्यातील पिके सुकून जात आहेत.
बातमी थोडक्यात
अक्कलकोट तालुक्यातील पिके पावसाच्या अभावी सुकून जात असून मातीतील ओलावा कमी झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी सुरुवातीला तुरळक पावसावर विसंबून पेरणी केली होती, पण आता उगवलेली पिके सुकून गेल्याने पेरणीवरील खर्च वाया गेला आहे. या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढण्याची शक्यता आहे.