
वारुंडीत वीजपुरवठ्यात खंड पडल्याने शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
बातमी थोडक्यात
वारुंडीत अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त असून, त्यामुळे पिकांचे नुकसान आणि भरमसाठ वीजदेयक येत आहे. वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करत महावितरणकडे निवेदन देण्यात आले. पेमदरा आणि वारुंडीतील शेतीपंपांना एकाच आने उपकेंद्रातून वीजपुरवठा होत असल्याने एकाच वेळी ताण येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.