
अपुऱ्या पावसामुळे भारताच्या तांदळाचे उत्पादन ७० लाख टन घटणार
बातमी थोडक्यात
अपुरा पाऊस आणि कमी लागवडीमुळे यावर्षी भारताच्या तांदळाचे उत्पादन ७० लाख टन घटण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये तांदळाच्या लागवडीखालील क्षेत्रात सर्वाधिक घट होणार असून अनुक्रमे ३.६१ आणि ३.२९ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान होणार आहे. ऑगस्टपर्यंत देशातील तांदळाचा साठा ६३९ लाख टन इतका समाधानकारक आहे.