
पिंपळगाव येथे 37 वर्षीय व्यक्तीशी 16 वर्षीय मुलीचा विवाह
बातमी थोडक्यात
पिंपळगाव बसवंत येथे 16 वर्षे 3 महिन्यांच्या मुलीचा विवाह 37 वर्षीय व्यक्तीशी झाला. परिसरातील एका हॉटेलमध्ये लग्नाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रकरणी मुलीची आई आणि नवऱ्याविरुद्ध पोलिसांची कारवाई करण्यात आली. पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गांगुर्डे यांच्यामार्फत तपास सुरू करण्यात आला आहे.