
राजकीय धुळीत गोकुळ निवडणूक
बातमी थोडक्यात
गोकुळची निवडणूक राजकीय धुळीत एक महिनाभर राहील. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजकीय धुमाकूळ सुरू होणार आहे. सत्तासंघर्ष तीव्र होईल की सोयीचे राजकारण करत नेते बिनविरोध लढतील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. कोल्हापूर सर्किट बेंचने ठरावधारकांना बदलण्यासाठी 175 संस्थांना पाच दिवसांचा अवधी दिल्याने ठरावधारकांशी नेते बैठका घेत आहेत.