
कल्याण-डोंबिवली कंत्राटी कामगारांचे पगार न झाल्याने झाले हाल
बातमी थोडक्यात
कल्याण-डोंबिवली परिवहन विभागातील शेकडो कंत्राटी कामगारांचे तीन महिन्यांचे पगार बुडाले असून गणेशोत्सवाच्या तोंडावर कुटुंबीयांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. मनसे नेते उल्हास भोईर यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने कामगारांनी तातडीने पगार देण्याची मागणी करत महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानी राखी बांधली. ठेकेदाराने थकबाकीची रक्कम देण्याचे आदेश झुगारले. त्यामुळे ८६ बस कंडक्टर कुटुंबे संकटात सापडली आहेत.