
त्र्यंबकेश्वर : कार-मोटारसायकलच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
बातमी थोडक्यात
आंबोली-वेळुंजे रोडवरील मोहनबाबा हगोटे येथे कार-मोटारसायकलच्या अपघातात २२ वर्षीय संदीप उगडे यांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इको वाहन आणि पल्सर मोटरसायकलच्या धडकेत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.