
दुष्काळामुळे सोलापूरमधील पिके वाया गेली
बातमी थोडक्यात
सोलापूर जिल्ह्यातील ४,०२,५२३ हेक्टरवरील पिके पावसाअभावी वाया गेली असून पिके बहरण्याच्या अवस्थेतच सुकून जात आहेत. पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली असून ती समिती सरकारला अहवाल देणार आहे. ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत ही पाहणी होणार आहे.