
आमदारांच्या निवासस्थानाजवळ तरुणाची हत्या
बातमी थोडक्यात
सिताबर्डी येथील आमदारांच्या घराच्या जवळ एका २५ वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. आमदारांच्या निवासस्थानाजवळच्या गल्लीत मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हत्येचा तपास करत आहे.