अरटिगा फायर ऑन सातारा हायवे नियर आनेवाडी
बातमी थोडक्यात
सातारा-पुणे-बंगळूरु महामार्गावर आनेवाडी गावाजवळ शॉर्ट सर्किटमुळे अरटिगा गाडीला आग लागली. गाडी चालक गणेश आनंदराव शिंदे यांनी गाडी महामार्गावरून बाजूला काढली. अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आगीने गाडी जळून खाक झाली. वाहतूक विस्कळीत झाली. टोल प्लाझा जवळ कायमस्वरूपी अग्निशमन दल असावे अशी मागणी करण्यात आली.