
पुसेगावच्या पाच दुकानांची एका रात्रीत चोरी
बातमी थोडक्यात
पुसेगाव-फलटण रस्त्यावरील पुसेगावच्या पाच दुकानांमध्ये शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ८. ३० या वेळेत चोरट्यांनी घुसून ४ लाख ६३ हजार ८५२ रुपयांचा माल लंपास केला. या चोरीमुळे व्यापारी वर्गात खळबळ माजली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांचा शोध घेतील अशी अपेक्षा आहे.